महिला पोलिसाला पोलीस स्टेशन मध्येच केली धक्काबुक्की.

शेअर करा.

खामगाव : गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्याचा संताप हा अनावर झालेल्या एका महिलेने गुरुवारी शहर पोलीस स्टेशनला एका महिला पोलिसाच्या अंगावर मोबाईल भिरकावत लोटालोटी केली, या घटनेमुळे शहर पोलीस स्टेशनला एकच खळबळ उडाली होती .

 

शहरात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात बाळापूर फैलातील एका आरोपीला गुन्हे शोधपथकाने पकडून आणले . या आरोपीच्या अटकेची माहिती प्राप्त होताच आरोपीची नातेवाईक असणारी ज्योती मोरे ( रा . बाळापूर फैल ) ही महिला गुरुवारी सकाळी शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली . पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरू केली . त्यावेळी तिला आवरण्याकरीता गेलेल्या सुनीता रामकिशन कश्यप ( ३८ ) या महिला पोलिसाला तिने अश्लील असा शिवीगाळ करत लोटपाट देखील केली . कुणालाही काही समजण्याच्या आधिच संतप्त महिलेने महिला पोलिसाला खाली पाडून जखमी केल्याचे कळाले आहे .

या घटनेमुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली दिसून येत आहे . त्यानंतर महिला पोलीस कश्यप यांच्या तक्रारीवरून ज्योती मोरे यांच्या विरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply