महिलेचा जीव वाचवला तो देखील गर्भाशयातील अडीच किलोची गाठ काढून वाचा संपूर्ण बातमी.

जळगाव : येथे गर्भाशयात असणाऱ्या अडीच किलोच्या गाठीमुळे जीवाला धोका आलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेला जीवदान आणण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांना यश मिळालेले आहे . या महिलेला खूप सार्‍या खासगी रुग्णालयांनी उपचार करून देण्यास नाकार दिल्यानंतर शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेले होते . या महिलेच्या नातेवाईकांनी २० सप्टेंबरच्या रोजी महिलेला रुग्णालयात दाखल केले . त्यावेळी विभाग प्रमुख डॉ . संजय बनसोडे यांनी महिलेची तपासणी आणि शस्त्रक्रिया पार पाडून अडीच किलोची गाठ काढली .

 

शस्त्रक्रियेसाठी डॉ.नरेंद्र पाटील , डॉ . शितल ताटे , डॉ . कोमल तुपसागर , डॉ . चंदन महाजन , डॉ.श्रद्धा पाटील , डॉ . राजश्री येसगे , डॉ.विनेश पावरा , डॉ . संदिप पटेल , डॉ . काजल साळुके , डॉ . स्वप्नील इंकणे , परिचारिका असलेल्या नीला जोशी ,कीर्ती तळेले यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published.