मामाची अल्पवयीन मुलगी घेऊन भाचा फरार ..

शेअर करा.

धुळे : तालुक्यातील मेहेरगाव येथून मामाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी बोरीस येथील ४५ वर्षीय भाच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मेहेरगाव ( ता . धुळे ) येथे एक १७ वर्षे सहा महिने चार दिवस वयाची अल्पवयीन मुलगी १२ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता शिवणक्लासला जाण्याचे सांगून घरातून गेली ; परंतु बऱ्याच प्रतीक्षेनंतर ती परत आली नाही . नातेवाइकांसह तिचा सर्वत्र शोध घेतला तरी ती सापडली नाही . दरम्यान , बोरीस ( ता . धुळे ) येथील भाचा याचा शोध घेतला असता तोदेखील घरी आढळून आला नाही त्यामुळे मुलीला त्यानेच पळविले अशी खात्री मुलीचे आईवडील आणि नातेवाइकांना पटली . त्यामुळे मुलीच्या वडिलांनी मंगळवारी सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . त्यानुसार सोनगिर पोलिसांनी भाच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.डी. पाटील करीत आहेत

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply