मार्चमध्ये १२ ते १४ वर्षे वयोगटाचे लसीकरण सुरू होणार का ?

शेअर करा.

दिल्ली : १२ ते १४ वर्षे वयोगटामधिल मुलांच्या लसीकरणाला फेनवीब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होउ शकतो , अशी शक्यता लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ . एन . के . अरोरा यांनी सांगितले .

 

त्यांनी सांगितले की , ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटामधील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली . यानंतर आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्तीच्या मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे . ही मोहीम अत्यंत वेगाने राबविली जात आहे .

 

देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ७.४ कोटी मुले असून त्या सर्वांना या महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोना लसीचा प्रथम डोस देण्याचे लक्ष्य आम्ही ठेवलेले आहे . डॉ . एन के . अरोरा यांनी सांगितले की , १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा शाळा , महाविद्यालयांसोबत अनेक ठिकाणी संचार असतो .

त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो . त्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण प्रथम हाती घेतलेले आहे . आता १२ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना लस देण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेतले जातील .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply