मालेगावची रुग्ण संख्या इतकी कमी का,इतका नियंत्रण कसे

शेअर करा.

नाशिक : राज्यात सर्वत्र दुप्पटीच्या पद्धतीने रुग्णसंख्या हि वाढत असताना मालेगावामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अवघी ६५ आहे . यामुळे मालेगावच्या कोरोना मुक्तीचे रहस्य हे नेमके काय असा प्रश्न उपस्थित होत असून , हे रहस्य उकलण्याकरीता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ६० समन्वयकांसोबत सुमारे ३५ तज्ज्ञ अशा संशोधकांचे पथक नियुक्त केलेले आहे .

या पथकाची प्रथम बैठक मंगळवारी मालेगावला पार पडली असून , रिसर्च टीममधल्या तज्ज्ञांकडून मालेगावामधील सुमारे अडीच हजार नागरिकांचे रक्ताचे स्मपल घेऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्याकरीता कारण मालेगाव काढा , अर्सेनिक अल्बम व जीवनशैलीचा एकत्रित अभ्यास करणार असल्याचे निश्चित ठरविण्यात आले .

मालेगावामधील कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडविणारे ठरले . परंतु , आता हेच संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेकरीता कुतूहलाचा विषय ठरले आहे . संपूर्ण राज्यभरात रुग्णांची संख्या हजारांनी आकडे वाढत असताना मालेगावमध्ये मात्र बोटावर मोजता येतील इतके रुग्ण आढळत आहेत . याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे . पहिल्या व दुसर्‍या लाटेदरम्यान लष्करी जवानांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या निवृत्त लेफ्टनंट जनरल तथा कुलगुरू डॉ . माधुरी कानिटकर यांच्या नेतृत्वात हा संशोधनात्मक अभ्यास तयार करून अहवाल शासनाला स्पष्ट केला जाईल .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply