मुंबईत रात्रीदेखील चालणार लसीकरण मोहीम जाणून घ्या काय असणार मोहिमेचा वेळ

शेअर करा.

मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्याकरिता लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे . या लसीकरण मोहिमेला वेग प्राप्त व्हावा, याकरिता महापालिका मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे . यानुसार मुंबईमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत लसीकरण सुरु ठेवण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे . मुंबईत सध्या पालिकेच्या केंद्रावरती सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान लसीकरण केले जाणार आहे . तर काही ठराविक केंद्रांवर संध्याकाळी सहा किंवा रात्री नऊ वाजेपर्यंत लसीकरण सुरू असणार असल्याचे कळाले आहे. या वेळेमध्ये वाढकरूण दहा वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा महापालिकेचा विचार आहे . मुंबईमधील बहुतांश जणांकडे लसीकरणाकरिता वेळ मिळत नाही .कामाच्या निमित्ताने मुंबईत येणारा किंवा मुंबईबाहेर जाणारा वर्ग रात्री लेट घरी परतत असतात . यामुळे लसीकरणाकरीता वेळ मिळत नाही , अशा वर्गाचे लसीकरण करण्याकरिता संपूर्ण दिवस भरामध्ये काही ठराविक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे , त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग चाचपणी करत आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply