आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा झाली .’मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा इशारा दिला की ‘सध्या जगभर कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची गंभीरपणे चर्चा सुरू असताना आपणही दुर्लक्ष करता कामा नये . प्रसंगी खंबीर पावले उचलत वेळ पडली तर पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागेल त्यामुळे जनतेने आपली व इतरांची काळजी घेणे आता आवश्यक झाले आहे.
जागतिक पातळीवर कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे . आपल्याकडे केरळ राज्यात मागील आठवडाभरात रुग्णसंख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे . पुढील दीड ते दोन महिने महत्त्वाचे असल्याचे टास्क फोर्सचे म्हणणे आहे . राज्यात पुन्हा लॉकडाउन लावण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तो लावावेच लागेल , असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले .
आगामी काळात बरेच असे सण साजरे होणार आहेत . यावेळी लोक एकत्र आल्याने संसर्गाचे प्रमाण वाढू शकते . ही बाब लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेत रुग्णांचा आकडा साठ लाखांपर्यत जाईल , अशी शक्यता वर्तविण्यात आहे . त्यामुळे सभा , मोर्चे , आंदोलने , यात्रा आदींवर प्रतिबंध लावण्याचा विचार या बैठकीत मांडण्यात आला . येत्या १५ सप्टेंबरपासून कोरोना संसर्गाचे आकडे वाढू लागतील , असा टास्क फोर्सचा अंदाज आहे . यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे . ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापसून कदाचित लॉकडाउन लावावा लागेल , अशी शक्यता मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी व्यक्त केली .