मुलांला खाऊ घालत नसल्याच्या त्याला आला राग आणि त्याने केले असे की तुम्ही वाचून थक्क व्हाल !

नंदुरबार : मुलांला खाऊ घालत नसल्याच्या रागातून भावाने चावा घेत आपल्याच भावाचे बोट तोडण्याचे प्रकरण समोर आले आहे . सविस्तर वृत असे की . आपल्या भावाची पत्नी मुलाला चांगले स्वाऊ – पिऊ घालत नसल्याच्या रागातून झालेल्या कौटूंबिक भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या बोटाचा चावा घेत थेट तुकडा पाडल्याची घटना मोहपाडा ता . अक्कलकुवा येथे सोमवारी रात्री याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहपाडा येथील घडली . अजय उपा वसावे याचा घटस्फोट झाल्याने त्याच्या मुलाचा मोठा भाऊ वनेश उपावसावे व त्याची पत्नी हे दोघे जण सांभाळ करत होते . दरम्यान वनेश याची पत्नी मुलाला व्यवस्थित खाऊ पिऊ घालत नसल्याच्या कारणातून अजय याने वहिनीसोबत वाद घातला होता . यावेळी वनेश याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता , अजय याने वनेश याच्या हाताच्या बोटाच्या कडकडून चावा घेत नखापासून तोडून टाकला . मोहपाडा येथील ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्यानंतर वनेश यास दवाखान्यात दाखल करण्यात आले होते . दरम्यान याप्रकरणी वनेश उपा वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अजय उपा वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.