मोबाईलचा अतिवापर पुरुषांसाठी ठरू शकतो जीवाला धोका जाणून घ्या सविस्तर.

शेअर करा.

Khandesh times news : पुरुषांनो सावधानतेचा इशारा! मोबाईलच्या जास्तीच वापरामुळे तुमच्या ‘ या सर्व ‘ गोष्टीवर होतोय थेट परिणाम त्याचे कारणदेखील तसेच थक्क करून देणारं आहे .

 

या नव्या डिजिटल युगामध्ये मोबाईल ने मानवी जीवनात मोठं स्थान मिळवलं आहे . एकमेकांशी संपर्क करण्यासाठी किंवा , फोटो , गाणे , डिजिटल व्यवहार असो की अजून बरंच काही तो फक्त मोबाईल वरती करतांना दिसत आहे , परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा दुर्ग तिच्या मार्गावर नेणारा असतो असतो , ज्या प्रमाणे Android मोबाईल मुळे अनेक फायदे झाले आहे त्याच प्रमाणे त्याचे मानवी शरीरावर अनेक परिणाम पण झाल्याचे दिसून आले आहे , नुकतेच एका संशोधनातून पुरुषांच्या शुक्राणूवर थेट परिणाम होतं असल्याचं धक्कादायक माहिती जगासमोर आली आहे .

 

चालू दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८ ९ शुक्राणू नमुन्यांच्या १८ रिसर्चचे संपूर्ण विश्लेषण केले आहे या संशोधणानंतर तज्ञांनी सल्ला दिला आहे की , मोबाईलममधून बाहेर पडणारे ‘ विद्युत चुंबकीय तरंग ‘ हे डायरेक्टली शुक्राणूंना नुकसान पोहोचवतात . ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शरीराला धोकादायक आहे त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पुरुषांनी मोबाईलचा वापर कमी करणे आवश्यक आहे .

 

मोबाईलच्या अतिवापरामुळे वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतच आहेत . नुकत्याच झालेल्या एका रिसर्च प्रमाणे मोबाईल फोनमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे . मोबाईलच्या अतीवापरामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या व गुणवत्तेवर परिणाम होत आहे . १८ अभ्यासांवर आधारित हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे .

 

सध्याच्या काळात मध्ये मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा खूप महत्वाचा हिस्सा झाला आहे . मोबाइल बघितला नाही तर अनेकांचा जीव अस्वस्थ होतो . जगभरामधील लाखो लोकांना दिवसभर मोबाईलवर काम करत रहावे लागते . लहान मुलांच्या अभ्यासापासून तर अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल लागतोच . शिवाय चांगलं नेटवर्क मिळाल्याने लोक आता प्रत्येक गोष्टीकरीता मोबाईल वापरत आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply