मोबाईल घेण्याकरिता पैसे नाही, कुठून आणणार मोबाईल ? दररोज जावे लागते सात किलोमीटर शाळेत.

शेअर करा.

अंबाजोगाई : वडील अपंग … आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असून . जिथे हाता – तोंडाचा कसाबसा मेळ लागतो त्या कुटुंबामधील मुलांना ऑनलाईन शिक्षणाकरिता मोबाईल कुठून उपलब्ध होणार ? परंतु , हीदेखील स्थितीत गणेश सुधाकर पन्हाळे हा १० वर्षांचा चौथी मधील विद्यार्थी दररोज ७ किलोमीटर सायकलने प्रवास करून शिक्षण घेत आहे .

 

हा मुलगा ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे प्राथमिक विद्यालयामध्ये शिकत आहे . गणेशची शिक्षणाबद्दलची ही आवड लक्षात घेत त्याच्या शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे यांनी त्याच्या एकटा करिता शाळा सुरू ठेवलेली आहे . गणेश कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले दुसरीत असताना मोबाईल अभावी ऑनलाईन शिक्षणापासून दुरावला गेला .या मुलांचं शैक्षणिक वास्तव अध् लक्षात घेऊन संभाजीराव बडगिरे विद्यालयाने गेल्या वर्षीचा अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करूनच पुढील वर्षाची सुरुवात केले .

 

यामुळे गणेश परत शिक्षणाच्या प्रवाहात आला . परंतु आता ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शाळा बंद झाल्या . शाळेतील इतर मुले ऑनलाईन स्वरूपाचा पद्धतीने शिक्षण घेऊ लागली . परंतु साधनांच्या व्यवस्थेअभावी गणेश ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकत नव्हता . गणेश हा दररोज सकाळी शाळेत येतो .

 

सात किलोमीटरचा येण्याजाण्याचा प्रवास करून घरी परतत असतो एवढंच नाही तर पुन्हा शेतातील गाईला चारापाणी पाहण्याकरिता शेतात जाऊन आई वडिलांना मदत करतो . हे सर्व करून देखील त्याचा दिनक्रम चुकत नाही.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply