म्हशीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू.

शेअर करा.

खामगाव : पाण्यामध्ये बुडत असणाऱ्या एका म्हशीला वाचवण्याच्या प्रयत्नांमध्ये युवकाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना अमडापूर या ठिकाणी ६ डिसेंबर रोजी घडल्याचे समोर आले आहे, घटनेमध्ये म्हशीचाही बुडाल्याने मृत्यू झाला असून मनोज गजानन हजारे ( वय २२ वर्षे ) रा .अमडापूर असे मृत युवकाचे नाव आहे अमडापूर येथील बस स्थानकाच्या परिसरात राहणारा मनोज हजारे हा युवक ६ डिसेंबर रोजी म्हशींना पाणी पाजण्याकरिता खंडोबा पाझर तलावावर गेला होता यादरम्यान त्यामधील एक म्हैस तलावात बुडत होती .

म्हैस पाण्यात बुडत असल्याचे पाहून म्हशीला पाण्याबाहेर काढण्यासाठी मनोज हजारे पाण्यामध्ये उतरला . पाण्याचा अंदाज न आकल्याने तो तलावात बुडाला . यामध्ये युवक व म्हैस या हादोघांचाही मृत्यू झाला .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply