• Tue. Aug 16th, 2022

  यंदा दिवाळीत फटाके विक्रीस बंदी, विक्रेत्यांचे होणार कोट्यावधी मध्ये नुकसान.

  ByKhandeshTimes

  Oct 21, 2021

  जळगाव विभागीय आयुक्त डॉ . राधाकृष्ण गमे यांनी विभागामधील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका , नगरपालिकांना फटाक्यांची बंदी या संदर्भात पत्र पाठवले आहे . या पत्रात जिल्ह्यामधील फटाके उत्पादक , होलसेल विक्रेते व त्याचबरोबर किरकोळ विक्रेत्यांमध्येच प्रचंड असा धमाका झाला . जिल्ह्यामध्ये एकूण दोन फटाके उत्पादक आहे . त्याच बरोबर १५ पेक्षा जास्तीचे होलसेल विक्रेते आणि अन्य किरकोळ विक्रेते देखील आहेत . या पत्रामुळे या सर्वांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे .

   

  दिवाळीच्या सीझनमध्ये फटाका व्यवसाय हा जोरावर असतो. साधारणतः जिल्ह्यात प्रत्येक वर्षी दिवाळीदरम्यान १५ ते २० कोटींच्यावर फटाका व्यवसायात उलाढाल झाल्याचे दिसते . वायू प्रदूषण , हवेची गुणवत्ता व त्याच बरोबर कोरोनाचा प्रार्दुभाव या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील महापालिका , नगरपालिका या क्षेत्रात फटाके बंदी करण्यात यावी , या संबंधित पत्र विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाठवल्याचे कळाले आहे .यामुळे जिल्ह्यातील फटाके विक्रेत्यांनी याच्या विरोधात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देखील दिले आहे . या निवेदनानुसार , जिल्ह्यात फटाका विक्री करणारे व्यावसायिक हे मोठ्या प्रमाणावर आहेत . या व्यवसायामधील खरेदी विक्री ही मुख्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यातच सुरू होते असत . आतापर्यंत अनेक व्यापाऱ्यांनी फटाका माल हा जास्तप्रमाणात खरेदी केला आहे . तर अनेक व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह हा फटाका व्यवसायावरच अवलंबून असल्याचे दिसते. हा हंगामी व्यवसाय असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी त्यासाठी कर्ज देखील काढले आहे . त्यामुळे अचानक या व्यवसायावर बंदी आणू नये .

  Leave a Reply

  Your email address will not be published.