• Tue. Aug 16th, 2022

    यंदा विसर्जनासाठी केवळ पाच व्यक्तींना परवानगी मिरवणूक , ध्वनिक्षेपक वाजवण्यास आहे बंदी.

    जळगाव : नशिराबाद येथे गणेश मंडळांच्या बैठकीत डीवायएसपी वाघचौरेंच्या सूचना प्रतिनिधी नशिराबाद गणेश उत्सवाच्या पाश्वभूमीवर गावात गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली . यात उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा व शासनाच्या नियमांचे कशा पद्धतीने पालन करावे याबाबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . बैठकीत डीवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले की , शासनाच्या नियमानुसार चार फुटाचा वरती गणेशाच्या मूर्तीला परवानगी नाही . तसेच मिरवणूक व ध्वनिक्षेपक वाजवण्यासाठी ही प्रशासनातर्फे परवानगी देण्यात आली नसून गणेश मूर्तीचे विसर्जन फक्त पाच व्यक्तींना परवानगी असल्याने मागील वर्षांच्या पद्धतीने यंदाही शासनाच्या दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे सांगितले .

    Leave a Reply

    Your email address will not be published.