‘ या ‘ कर्मचाऱ्यांचा २०२२ पर्यंत PF सरकार भरणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा.

शेअर करा.

( Coronavirus Pandemic ) मध्ये आपली नोकरी जाणाऱ्या लोकांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे . कोरोना काळात ज्या लोकांना नोकरी गमवावी लागली आहे त्यांचा पीएफ ( PF ) केंद्र सरकार २०२२ पर्यंत भरणार असल्याचं कळवण्यात आले आहे . अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लखनौ येथे शनिवारी यासंबंधी घोषणा केली . यावेळी , या योजनेचा लाभ त्याच लोकांना मिळणार आहे ज्या युनिट्सची EPFO मध्ये नोंदणी असेल ..

कोरोनामहामारीच्या काळात ज्या लोकांनी आपली नोकरी गमावली आहे त्यांच्या कर्मचारी आणि कंपनीकडून देण्यात येणाऱ्या दोन्ही पीएफचे भाग केंद्र सरकार भरण्याचे असल्याचं सीतारामन यांनी कळवले . २०२२ पर्यंत केंद्र सरकार हे दोन्ही भागाची पूर्तता करणार आहे . परंतु कोरोनाच्या या काळात ज्या लोकांनी आपली नोकरी गमावली आणि नंतर फॉर्मल सेक्टरमध्ये छोट्या लेवलच्या नोकरीसाठी बोलवण्यात आलं , त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं . तसंच यासोबत त्याच लोकांना यात सहभागी केलं जाईल ज्यांच्या कंपनीची EPFO मध्ये नोंदणी असेल.

” जरी कोणत्याही जिल्ह्यात इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करणारे २५ हजारांपेक्षा अधिक जोबर आपल्या गावी आले असतील तर केंद्र सरकारच्या १६ योजनांअंतर्गत त्यांना रोजगाराची संधी दिला जाईल , ” असंही सीतारामन म
यांनी सांगितले . तसेच मनरेगाच्या बजेटमध्येही बढती करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं . मनरेगाचं बजेट आतता ६० हजार कोटी रूपयांवरून १ लाख कोटी रूपये करण्यात आल्याचं कळवले .

महिलांच्या आर्थिक विकासावर लक्षमहिलांचा आर्थिक विकास लक्षात ठेवत केंद्र सरकारनं नव्याअनेक योजना सुरू केल्याचं सीतारामन यांनी मिशन शक्ती या कार्यक्रमाच्या प्रसंगी कळवले . केंद्र सरकारची जनधन योजना , मुद्रा कर्ज हे महिला केंद्रीत आहेत असे त्यांनी म्हटलं . याशिवाय एक्झिम बँक आणि सिडबीद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘ उभरते सितारे ‘ या फंडची सुरूवात त्यांनी केली .

MSME ला स्थान दिलंदेशाच्या अर्थव्यवस्थेचा कमा असलेल्या सूक्ष्म , लघू आणि मध्यम उद्योगांना ( MSME ) दशकांपर्यंत जी जागा मिळाली नाही , ते या सरकारनं स्थापित करून दिलं . मोदी सरकारनं एमएसएमईला योग्य पहचान दिली . यापुढेही त्यांचं स्थान अधिक सक्षम करण्यावर काम करण्यात येईल . गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारनं अनेक वेगवेगळ्या गोष्टीही केल्या आहे . सरकारनं एमएसएमईची व्याख्या अगदी सुरळीत बदलली असल्याचंही सीतारामन म्हणाले .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply