रस्ता खचल्यामुळे भरधाव टिप्पर उलटला ; 13 मजुरांचा दबून मृत्यू

शेअर करा.

२ गंभीर जखमी , पाच वर्षीय मुलगी सुखरूप बचावली

सिंदखेडराजा / जालनाः समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांना नेऊन जाणारा लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात सळयांखाली दबून १३ मजुरांचा भीषण मृत्यू झाला . शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली . समोरून येणाऱ्या बसला साइड देताना देऊळगावमही ते दुसरबीड मार्गावर तळेगावजवळ रस्ता खचून टिप्पर उलटल्याने हा अपघात घडुन आला . या अपघातात तिघ गंभीर जखमी झाले . त्यांना जालना येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . या अपघातातून पाच वर्षीय मुलगी सुखरूप बचावली . बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे . त्याचा कॅम्पस तढेगाव येथे आहे . समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशवइतर भागातून आलेले मजूर कॅम्पजवळ राहतात . शुक्रवार , २० ऑगस्टला सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती .

सर्व मृत मजूर मध्य प्रदेशातील मृतांत गणेश जगदीश डावर ( २१ , मेलखेडी ) , लक्ष्मण धन्नालाल डावर ( २८ , मोहेदा ) , दीपक प्रताप डावर ( १ ९ , मेलखेडी ) , सुनील प्रताप डावर ( २५ , मेलखेडी ) , नारायण विक्रम डावर ( २५ , मेलखेडी ) , जितेंद्र शंकर मकवणी ( १६ , मक्षी ) , महेश कटारे ( ३१ , बबलपी ) , देवराय पुंजीलाल ओसारी ( २० , काचीकुआ ) , गोविंद सिलाटे ( २८ , बोंडल , जि.धारद ) , मिथुन मचारे ( १८ , कातर , जि . धार ) करण मकवणी ( २१ , काकलपुरा , जि . धार ) , दिनेश मोरसिंग गावड ( ३० , हनुमंत्या , जि . धार ) , दिलीप कटारे ( २१ , अंबापुरा , जि . धार ) अशी मृतांची नावे आहेत .

केबिनमध्ये बसलेले तिघे वाचले : या अपघातात लोकेश कैलास मकवणी ( १ ९ ) , रघुनाथ उमरा बाबर ( ५० , बडबेर , जि.खरगोन ) यांच्यासह चालकाच्या केबिनमध्ये बसलेली पाच वर्षीय मुलगी शकू दिनेश डावर हे तिघे वाचले .

राहेरी पूल जीर्ण झाल्यामुळे अरुंद रस्त्यावरून वाहतूक सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . कॅम्पसमोरून जाणारा मार्ग पर्यायी वळनाचा रस्ता म्हणून वापरला जातोय . यावर प्रचंड खड्डे व चिखल झाला आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply