रुग्णवाहिकेचा वापर चक्क चोरीसाठी.

जळगाव : खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांनी मद्याच्या नशेत शहरातून करण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी त्यांनी रुग्णवाहिकेचा वापर केला आहे.त्यांना एकाही ठिकाणी यश आले नाही , मात्र सीसीटीव्ही कॅमे – यात कैद झाल्याने थेट पोलीस कोठडीचीच हवा खायची वेळ आली , दिनेश शिवदास राठोड वय २४ , रा.वाघ नगर ) व योगेश संजय बाजड ( वय २३ , रा.गेंदालाल मील अशी संशयितांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश व योगेश दोन्ही खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करतात तर राठोड हा रुग्णवाहिकाही चालवितो . मेहरुणमधील एका रुग्णालयाची ही रुग्णवाहिका क्र.एम.एच .२४ सी .६८७१ ) आहे . ऑगस्ट रोजी दोघांनी रात्री मद्यप्राशन केल्यानंतर रुग्णवाहिकेने जाऊन पिंप्राळा रस्त्यावरील छाबडा एजन्सीबाहेर लावलेल्या कारमध्ये क्र.एम.एच .१ ९बी.जे .०५५४ ) छेडछाड करण्याचा प्रयत्न केला . अखेरपर्यंत दरवाजा न उघडल्याने चोरीचा प्रयत्न असफल झाला , मात्र दरवाजाच्या पट्ट्या त्यांनी चोरुन नेल्या . यानंतर आणखी दोन ठिकाणी देखील त्यांना अपयश आले . कार मालक कुणालरामदास हातकर ( वय ३६.रा.भुसावळ ) हे छाबडा एजन्सीच्याच कामानिमित्त इंदूर येथे गेले होते . २८ रोजी ते परत आल्यावर कारमध्ये छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला . सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रुग्णवाहिकेतून आलेले दोन जण कार चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले .

Leave a Reply

Your email address will not be published.