रुग्णालयातील आग रोकेल Ultrasonic Camera कोरोणाच्या तिसऱ्या लाटेची होते तंतोतंत तयारी.

नागपूर : मागच्या ११ महिन्यांत राज्यांमधील रुग्णालयांना लागलेल्या आगेमध्ये जवळजवळ ७२ रुग्णांचा आग होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती . आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट आणि ऑक्सिजन गळती असे हे मुख्य कारण होते . सध्या कोरोनाच्या संभाव्यअसलेल्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरता सर्वच शासकीय आणि मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे मोठे प्लांट उभारले जात आहेत . आता यामुळे आगीचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे . तो रोखण्याकरिता ‘ अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार असल्याचे कळाले आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ७५ ते ८० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली होती . परिणामी , सर्वच ठिकाणी ऑक्सीजन चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा पडला .

 

शेजारच्या राज्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा मागवण्यात वेळ आली . यावर दाखल एका याचिकेवर न्यायालयाने ५० किंवा त्यापेक्षा अधिक खाटा असणारे खासगी रुग्णालयांना स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .

 

शासनाने देखील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याला गती प्राप्त करून दिलीआहे . त्यामुळे बहुसंख्य रुग्णालयांत हे प्लांट स्थापन झाले . मात्र ऑक्सिजनच्या गळतीकडे जास्त करून कोणाचे लक्ष नाही .

 

नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ही बाब गांभीर्याने घेऊन . गळती ओळखण्यासाठी ‘ अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’चा प्रस्ताव तयार केल्याचे कळाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.