रॅम कमी असल्याने स्मार्टफोन वारंवार हँग होतोय ? मग सरळ ही ट्रिक वापरा आणि पहा .

बऱ्याचदा आपला फोन खूप चांगला असतो पण आपल्याला त्याची रॅम अपुरी किंवा कमी पडू लागते . अशावेळी फोन हँग होणं आणि त्यासोबत अनेक तक्रारी जाणवायला लागतात . तुमच्या फोनची रॅम कमी असेल तरीसुद्धा सुसाट वेगानं तुमचा फोन चालेल त्यासाठी आज सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत .

या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा फोन चांगल्या पद्धतीनं वापरू शकता . ज्यामुळे तो हँग होणार नाही .

* नको असलेले फोटो व्हिडीओ वेळच्या वेळी डिलीट करा . *त्याच सोबत आपल्या फोनमध्ये कायम रनिंग अॅप्स क्लीअर करत राहा . त्यामुळे रॅम जास्त भरणार नाही .

* नको असलेले अॅप वेळच्या वेळी उडवून टाका .

* आपल्या फोनमध्ये कायम अपडेट व्हर्जन येत राहतात . काहीवेळा आपण डेटा जाईल किंवा मोबाईलची रॅम भरेल म्हणून अपडेट करत नाही . मात्र ही चूक करू नका . वेळच्या वेळी सॉफ्टवेअर अपडेट करत राहा .

* Settings > About Phone > software updates मध्ये जाऊन आपलं सॉफ्टवेअर अपडेट करा .

* बऱ्याचदा आपल्या फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर सुरू असतो . त्यामुळे मोबाईलच्या सॉफ्टवेअरला जास्त काम करावं लागतं . त्यामुळे फोनची बॅटरीही लवकर उतरते . ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या फोनमधील लाईव्ह वॉलपेपरचा पर्याय बंद ठेवा .

* त्याशिवाय फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन About Phone > Software information मध्ये Build Number वर सिलेक्ट करा . त्यामुळे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील . तिथे अॅनिमेशन सेटिंगमध्ये बदल करा . स्क्रिनची वॅल्यू 0.5X सेट करा .

* काही लोकं आपल्या फोनमध्ये वेजेस ठेवतात . ती चूक तुम्ही करू नका त्यामुळेही तुमचा फोन हँग होऊ शकतो . कायम आपल्या फोनमधील वेजेस क्लिअर करणं गरजेचं आहे .

सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर काहीवेळा आपल्या फोनमध्ये काही नवीन अॅप देखील येतात . जे अॅप आवश्यक नाहीत त्यांना तातडीनं डिलीट करा . यामुळे आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता सुधारेल.

Leave a Reply

Your email address will not be published.