रेल्वे गाड्यामध्ये प्रवास करणाऱ्या फुकट्यांमध्ये निर्माण झाले भितीचे वातावरण काय कारण ?

यावेळेस रेल्वे गाड्यामध्ये प्रवास करणाऱ्या फुकट्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण भुसावळ मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे १ ते २३ ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली होती . त्यात १ हजार ५७६ फुकट्या प्रवाशांकडून १० लाख २२ हजार ४३० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला .

रेल्वेतर्फे तिकीट तपासणी करण्याची विशेष मोहीम डीआरएम एस.एस. केडीया आणि वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या आदेशावरून संपूर्ण विभागात १ ऑगस्टपासून राबवण्यात आली . त्यानुसार विभागात ५१० तिकीट निरीक्षक , आरपीएफ कर्मचाऱ्यांनी कारवाई करत २३ दिवसांच्या काळात १ हजार ५७६ फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल केला . या पथकाने १० लाख २२ हजार ४३० रूपयांचा दंड वसूल केला . यामुळे विशेष गाड्यामध्ये प्रवास करणाऱ्या फुकट्यांमध्ये भितीचे वातावरण आहे . भविष्यात देखील रेल्वे प्रशासन विशेष तपासणी यंत्रणा कार्यान्वित ठेवणार आहे . त्यामुळे कुणीही नियमबाह्य पद्धतीने विशेष गाड्यांमधून प्रवास करू नये . अन्यथा कारवाई होईल , असे रेल्वे प्रशासनाने सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published.