रेल्वे मंत्रालयात २ लाख जागा रिक्त त्याच बरोबर केंद्रात शिक्षकांची १० लाख पदे रिक्त.

शेअर करा.

नवी दिल्ली : देशात कोरोना वाढत असलेल्या महामारी मुळे अनेकांवर बेरोजगारीचे मोठे संकट आले आहे . ३ दिवसांपूर्वीच बिहारमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गोंधळावरून तरुणांनी आंदोलन केले . सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहिती प्रमाणे केंद्रात लाखो पदे रिक्त आहेत . परंतु ती भरण्याची प्रक्रिया संथपणे सुरू असल्याचे चित्र आहे .

यानुसार १ मार्च २०२० पर्यंत केंद्रात ८ लाख ७२ हजार पदे रिक्त होती . शिक्षकांच्या असलेल्या रिक्त जागा त्यात जोडल्यास हा आकडा १८ लाखांवर येतो . मंजूर झालेल्या पदांची संख्या ४० लाखांहून अधिक असून , २१ टक्के पदे रिक्त आहेत एकट्या रेल्वे मंत्रालयात २ लाख ३७ हजार पदे रिक्त आहेत .

मंजूर झालेल्या पदांच्या संख्ये अनुसार हा आकडा ५ टक्के आहे गृहमंत्रालयात १ लाख २८ हजार ८४२ , विज्ञान व तंत्रज्ञान विभागात हजार २२७ पदे रिक्त आहेत .

प्रत्येक वर्षी देशातील तरुणांना एक कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयात देखील२६ टक्के पदे रिक्त आहेत . निती आयोगातही इतर मंत्रालयांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत . देशातील सार्वजनिक बँकांमध्येही ४१ हजार पदे रिक्त पडलेली आहेत देशभरात ६१ लाख ८४ हजार शिक्षकांची पदे मंजूर आहेत . त्यांपैकी १०.६ लाख पदे रिक्त आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply