• Tue. Aug 16th, 2022

  लपंडाव खेळतांना तो घराच्या मागच्या बाजूस लपण्यासाठी गेला आणि दिसला प्रौढाचा मृतदेह.

  ByKhandeshTimes

  Sep 12, 2021

  जळगाव : गल्लीत लंपडाव खेळत असतांना एक मुलगा एका घराच्या मागच्या बाजूस लपण्यासाठी गेला असता त्याला खिडकीच्या आत एका प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले . हे दृष्य पाहून त्या मुलास जबर धक्का बसला . ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता वसंतवाडी येथे घडली . प्रेमराज ठाकूर राठोड ( वय ४० ) असे मृत प्रौढाचे आहे . राठोड हे शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होते . शुक्रवारी सकाळी वसंतवाडी येथे काही लहान मुले लपंडाव खेळत होते वेळी एक मुलगा राठोड यांच्या घरामागे लपण्यासाठी गेला . त्यावेळी त्याला खिडकीतून आतमध्ये राठोड गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले . दृष्य पाहून मुलास प्रचंड धक्का बसला भयभीत झालेला हा मुलगा पळतच घरापुढे आला . त्याने नागरिकांना ही सांगितली . नागरिकांनी राठोड यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांना खाली उतरवले . यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले . वैद्यकीय घटना अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले . राठोड यांच्या पत्नी बाहेरगावी गेलेल्या होत्या . तर दोन्ही मुले कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेले होते . घरात एकटे असलेल्या राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली . या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.