लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच मिळणार रेल्वेचे तिकिट .

Jalgaon : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर , रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्याटप्प्याने एक्सप्रेस गाड्या पूर्ववत करण्यात येत आहेत . मात्र , या गाड्या पूर्ववत होत असताना , रेल्वे प्रशासनाने लसीकरणाचे दोन डोस घेतले असतील , तरच त्यांना रेल्वेचे तिकीट मिळणार आहे . त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी लसीकरणाच्या प्रमाणपत्राच्या प्रत सोबत ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .

पावणे दोन वर्षापूर्वी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर , रेल्वे प्रशासनाने सर्व मार्गावरच्या पॅसेंजर गाड्या बंद केल्या होत्या . तसेच एक्सप्रेस गाड्यानांही जनरल तिकीट बंद करून , केवळ तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे . मात्र , आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.