लेग स्पिनर Shane Warne यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

शेअर करा.

सिडनी : आपल्या जादुई फिरकीच्या तालावरती मोठे मोठे फलंदाजांची भंबेरी उडवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न ( ५२ ) याचे शुक्रवारी अकाली निधन झाले .

थायलंडमधील कोह सामुई या ठिकाणी असणार व्हिलामध्ये वॉर्न बेशुद्धावस्थेत आढळून आला . त्याला वाचविण्याचे कठीण प्रयत्न वैद्यकीय तज्ज्ञांनी केले . परंतु , त्यात त्यांना अपयश आले . हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचे निधन झाल्याचे समजते .

उल्लेखनीय असे की ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक रॉडनी मार्श ( ७४ ) यांचे देखील शुक्रवारी निधन झाले . वॉर्नच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण क्रिकेटविश्वाला दुःखद असा धक्का बसला आहे . आयपीएलमध्ये कर्णधार म्हणूनही वॉर्नने छाप पाडली होती

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply