लॉकडाऊन होणार नाही परंतु निर्बंध कठोर राहणार, शासनाचा निर्णय.

शेअर करा.

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली तरी राज्यामध्ये सध्या लॉकडाऊनचा करण्याचा काहीही विचार दिसत नाही , परंतु निर्बंध हे अधिक कठोर केले जातील . राज्यात ऑक्सिजनची गरज ७०० मेट्रिक टना यावर गेली असल्यावरच लॉकडाऊन होईल , असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे . गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ९ , १७० नवे रुग्ण समोर येत आहेत . एकट्या मुंबईत ६ हजारांहून अधिक रुग्ण सापडलेले आहेत . राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजारांहून जास्तीची दिसत आहे .

 

ओमायक्रॉनबाधितांची संख्या जोरदार रित्या वाढत आहे . मात्र , या रुग्णांची तब्येत गंभीर दिसत नसून . डेल्टामुळे रुग्णांची तब्येत बिघडते व ऑक्सिजन लागतो , मृत्यूचे प्रमाण वाढते . त्यामुळे ओमायक्रॉन व डेल्टाचे प्रमाण कळण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत . सध्या कुणीही घाबरून जाता कामा नये , असे म्हणाले .

परवा कोरोनाचे ५ हजार रुग्ण आढळले होते . काल साडेआठ हजार झाले व आजही रुग्ण वाढले आहेत . त्यामुळे निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply