वाळू चा डंपरने अजून एक घेतला बळी, भिषण अपघातात परिचारिका जागीच मृत्यू .

शेअर करा.

भुसावळ News :

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक अपघातात मृत्यू झाला आहे . जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीमुळे होणारे अपघात नित्याचेच झाले आहे . अपघात जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक दुपारी वाळू डंपर क्रमांक एमएच .१ ९.वाय .७७७३ ने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली . या धडकेत प्रेरणा देविदास तायडे वय -३२ रा.कंडारी , ता.भुसावळ हिचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिच्या स्कुटीचा चुराडा झाला आहे .

घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे , सहाय्यक फौजदार अलीयार खान , कर्मचारी हसरत सैय्यद , महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली .

अपघात इतका भयंकर होता कि दुचाकी डंपरच्या खाली दाबली जाऊन महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आहे . मयत प्रेरणा तायडे या जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका असून कामावरून सुट्टी झाल्याने त्या घरी जात होत्या . नशिराबाद पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे . मयताच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply