विद्यापीठाचा निर्णय : बॅकलॉग असलेले विषय आता कॅरिफारवर्ड होणार.

शेअर करा.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा , वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा , मानव्य विज्ञान विद्याशाखा आणि आंतर- विद्याशाखीय अभ्यास या अंतर्गत येणाऱ्या पदवी , पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१ २०२२ करिता पुढील वर्षात प्रवेश द्यावा व बॅकलॉग असलेले विषय कॅरिफारवर्ड होतील , असा महत्त्वाचा निर्णय विद्या परिषदेच्या वतीने कुलगुरूंच्या मंजुरीने घेतला आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून , ही सवलत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता लागू राहील , अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे . यामुळे विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply