विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना आजपासून सुरुवात.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये , मान्यता प्राप्त परिसंस्था व विद्यापीठ प्रशाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ यामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची डिसेंबर / जानेवारीमधील परीक्षा २१ डिसेंबरपासून सुरू होत आहे . या सर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपाने होणार आहेत .

कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्याची स्वरुपात स्मार्ट फोन , लॅपटॉप , वेब कॅमेरासह डेस्कटॉप संगणकव्दारे पार पाडल्या जाणार आहेत . या परीक्षेसाठी ५८ हजार विद्यार्थी प्रविष्ठ आहेत . पदवी परीक्षेकरिता दीड तास तर पदव्युत्तर परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आला असून जेवढे वस्तुनिष्ठ मल्टिपल चॉइस प्रश्न देण्यात येतील ते सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक असणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.