• Tue. Aug 16th, 2022

  विद्यापीठ अभ्यास मंडळावर प्रताप कॉलेजमधील विद्यार्थिनींची झाली निवड.

  ByKhandeshTimes

  Sep 19, 2021

  अमळनेर : प्रताप कॉलेजमधील एम.ए. मराठीतील विद्यार्थिनी ज्योत्स्ना राहुल कांबळे यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी(KBC) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळा वरती निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली गेली आहे . २०१ ९ -२० च्या दरम्यान ज्योत्स्ना कांबळे ही एम.ए. मराठीत ९ ५.६० टक्के गुण प्राप्ती करून विद्यापीठा मध्ये विशिष्ट अस्या प्रावीण्यासह गोल्ड मेडलची मानकरी ठरली आहे.अभ्यास मंडळात विद्यार्थिनीच्या या सहभागाने विद्यार्थ्यांना पूरक व उत्कृष्ट आणि उपयोजनात्मक अभ्यासक्रमा निगडीत सूचना अभ्यासक्रम समितीला प्राप्त होतील या दृष्टिकोनात तिची ही नियुक्ती महत्वपूर्ण आहे .

  या नियुक्तीबद्दल खा . शि . मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ . पी . आर . शिरोडे , उपप्राचार्य डॉ . एम . एस . वाघ , उपप्राचार्य डॉ . जी . एच . निकुंभ , उपप्राचार्या डॉ.कल्पना पाटील , डॉ.जयेश गुजराथी , मराठी विभागप्रमुख डॉ . रमेश माने , मराठी विभागा मधले प्रा . ज्ञानेश्वर कांबळे , प्रा . योगेश पाटील , प्रा . विलास गावीत , प्रा . ज्ञानेश्वर खलाणे , प्रा.किरण पाटील यांनी तिचे स्वागत केले नाही .

  Leave a Reply

  Your email address will not be published.