विद्यार्थिनींना बससेवेसाठी करावी लागतेय मागणी , शिक्षणाचे होत आहे नुकसान.

शेअर करा.

नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ गावाकरिता नंदुरबार बसस्थानक येथून हररोज दुपारी सुटणारी ST बस नियमित वेळेवर रवाना करण्यात यावी , याच्या मागणीकरीता विद्यार्थिनींनी शनिवारला आगारात ठिय्या आंदोलन करण्यात आले . विद्यार्थिनींनी अचानक दिलेल्या या ठिय्यामुळे आगाराच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची झोप उडाली होती .

 

पूर्व भागातील शनिमांडळ या परिसरातून विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षणाकरिता नंदुरबार येथे येत असत . या विद्यार्थिनींना महाविद्यालयातून परत जाण्यासाठी दुपारी दोनची बस नंदुरबार ते शनिमांडळ सोयीची आहे . याकारणी विद्यार्थिनी महाविद्यालयातून पळापळ करत बसस्थानक यावे लागत असे.मात्र मागील काही दिवसांपासून ही बस तीच्या वेळी लागत नाही अशी तक्रारी विद्यार्थिनींकडून करण्यात आल्या आहेत .

 

यातून शनिवारी विद्यार्थिनींनी बस आगारात जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी आगाराच्या प्रमुखांनी बस वेळेवर रवाना करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनी तेथून रवाना झाल्या . यावेळी विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनअंतर्गत रवाना करण्यात येणारी मुख्य बससुध्धा वेळेवर येत नाही अशी तक्रारी विद्यार्थिनींनी केल्या . सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सफल करण्यात आले .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply