विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा 11 ऑक्टोंबर पासून सुरू,परीक्षा होणार ऑनलाईन पद्धतीनेच.

शेअर करा.

जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या किंवा काही कारणास्तव परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे दि . ११ ते १३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेलेआहे . १ ऑगस्टपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत झालेल्या उन्हाळी परीक्षांचे निकाल हे जाहीर केले गेले असून या परीक्षा मधील बहिस्थ लेखी आणि बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना उपस्थित नसलेले किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्याच्या निर्णय हा विद्यापीठाने घेतलेला आहे .

बहिस्थ लेखी परीक्षा ही ११ ते १३ ऑक्टोबरच्या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ( एमसीक्यू स्वरूपामध्ये स्मार्ट फोन , लॅपटॉप , डेस्क स्टॉप वेब कॅमेरा सोबत याद्वारे घेण्यात येणार आहेत. संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांनी या कालावधीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या लिंक वरून परीक्षा द्यायची आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply