विद्यार्थ्यांना अजून 15 फेब्रुवारीपर्यंत पहावी लागेल वाट, महाविद्यालय राहणार बंद

शेअर करा.

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यांमधील सर्व महाविद्यालये आता १५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहेत . ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवून परीक्षादेखील ऑनलाईनच घेतल्या जाणार आहेत . त्याच बरोबर विद्यार्थ्यांची शाळांमधील बाधितांची संख्या वाढल्याने औरंगाबाद शहर , रायगड जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत . नागपूर शहर आणि हिंगणा , कामठी कळमेश्वर सावनेर तालुक्यांमधील शाळा देखील बंद राहणार आहेत . उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू , विभागाचे प्रधान सचिव , तंत्रशिक्षण संचालक , जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आलेली होती .

ज्या कोणी विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे , त्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना देखील महाविद्यालये आणि विद्यापीठांना दिल्या गेल्या आहेत . शालेय शिक्षण विभागाच्या काही परीक्षा या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कला संचालनालयाच्या अखत्यारित येतात . यामुळे कला शिक्षण संचालनालयाला त्या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत . – उदय सामंत , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply