विवाहित महिलेचा होतो आहे छळ ,नंदुरबार ची घटना.

नंदुरबार : दारू पिऊन नवरा मारहाणकरीत असतो  , सासरची लोक छळ काढतात, या सर्व कारणावरून नंदुरबारा मधील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा ठिकाणच्या चार जणांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार , नंदुरबारा येथील राजीव गांधीनगर भागात माहेर च्या घरी परतलेल्या पूनम अविनाश मराठे या महिलेचा पारोळा येथील गांधीनगर भागात स्थाईक असलेल्या अविनाश रामचंद्र मराठे यांच्याशी विवाह झाला होता .

अविनाश हा दारूच्या व्यसनाधीन असल्यामुळे ते नेहमीच दारू पिऊन मारहाण करीत असल्याचे विवाहितेचे सांगितले आहे . तसेच सासरची मंडळी सुद्धा पतीची (अविनाश मराठे) बाजू दाखवून शारीरिक त्याचबरोबर मानसिक छळ करतात . या छळाला कंटाळून पूनम यांनी नंदुरबार जिल्हा महिला दक्षात कक्षात तक्रार नोंदविली होती. याठिकाणी उचित असा न्याय न मिळाल्याने शेवटी त्यांनी फिर्याद दाखल केली . त्यांच्या फिर्यादीवरून अविनाश रामचंद्र मराठे , सुशिला रामचंद्र मराठे , रामचंद्र मराठे व वर्षा शंकर शहाणे सर्व रा . पारोळा यांनविरोधातनंदुरबार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.