वृद्धाने ऑनलाइन साडी मागविली ; ती खराब निघाली आणि परत करतांना ७५ हजारात गंडवले.

शेअर करा.

जळगाव : सायबर क्राईम चे गुन्हे वाढत असताना पुन्हा याच्या संदर्भात एक नविन प्रकरण समोर आले आहे . ऑनलाइन मागविलेली साडी खराब निघाल्याने ती परत करतांना अनंत नारायण कुलकर्णी (वय ६७) यांना ७४ हजार ९९९ रुपयांत ऑनलाइन गंडविल्याची घटना समोर आली आहे . याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सेवानिवृत्त कर्मचारी असलेले अनंत नारायण कुलकर्णी यांनी यांनी ३१ ऑगस्ट रोजी आयबीआयएसबी या कंपनीतून ऑनलाइन साडी मागविली होती . मात्र ही खराब निघाल्याने कुळकर्णी यांनी गुगलवरून कंपनीचा संपर्क क्रमांक मिळविला.त्यावर संपर्क साधला असता , संबंधितांनी एनी डेक्स ॲप डाऊनलोड करायला सांगितले . यादरम्यान कुलकर्णी यांना त्यांचा मोबाइल नंबरही दिला. ॲप डाऊनलोड करताच कुलकर्णी यांच्या बँकखात्यातून पहिल्या वेळी २५ हजार , दुसऱ्या वेळी ४ ९ हजार ९९९ असे एकूण ७४ हजार ९९९ रुपये कपात झाले . त्यामुळे पोलीस याचा आता तपास करीत आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply