• Tue. Aug 16th, 2022

  वैज्ञानिकांचा अभ्यासात दावा : कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी प्लास्टिक शील्ड पूर्णपणे उपयोगी नाही

  ByKhandeshTimes

  Aug 21, 2021

  कोरोनापासून बचावासाठी जगभरात प्लास्टिक शील्ड वापरले जात आहे . कॅशियरला खरेदी करणाऱ्यांपासून लांब ठेवण्यासाठी , सलून अथवा वर्गात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्लास्टिक शील्ड उपयोगात घेतली जात आहे . प्लास्टिक शील्ड कोरोनापासून सुरक्षा देईल , असे लोकांचे म्हणणे आहे . पण एअरोसोल , एअरफ्लो व व्हेंटिलेशनचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते , अनेक वेळा हे अडचणीत प्रभावी ठरत नाहीत , तर स्थितीत आणखी बिघाड करू शकतात .

  वैज्ञानिकांच्या मते , त्यामुळे लोकांना आपण सुरक्षेच्या घेर्यात आहोत , असे भासते , पण ते खोटे असते . वेगवेगळ्या अभ्यासांतून सामोऱ्यास आले आहे की , चेकआउट काउंटरच्या मागे बसलेल्या मनुष्याला सुरक्षा देणारे शील्ड विषाणूला दुसऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत नेऊ शकते , कारण शील्डमुळे हवेचा सामान्य प्रवाह तुडवला जातो . व्हर्जिनिया टेकमध्ये पर्यावरण अभियांत्रिकीच्या प्राध्यापक लिन्से मरी यांनी सांगितले की , खोकताना किंवा शिंकताना निघालेले मोठे कण हे शील्ड रोखू शकते , पण बोलताना निघणारे कणांचा फैलाव रोखण्यास शील्ड पुरेसी नाही . कोरोना हा अदृश्य एअरोसोल कणांपासून फैलावतो , त्यामुळे प्लास्टिक शील्डचा किती उपयोग होतो , याबाबत आशंका आहे . लीड्स विद्यापीठातील पर्यावरण इंजिनिअरिंगच्या तज्ञ कॅथरीन नोक्स यांनी सांगितले की , लहान एअरोसोल शील्डवर प्रवास करतात आणि ५ मिनिटांत रूममधिल हवेत मिसळून जातात . म्हणजे लोक बराच वेळ बोलत असले तर शिल्ड असूनही विषाणूच्या संपर्कात लोक येऊ शकतात . तसेही शील्ड ज्याप्रकारे लावले जाते , त्यामुळे खूप फायदा होण्याची शक्यता नाही .

  शील्ड म्हणजे स्वंर्कशन नव्हे , मास्क घालने उपयुक्त : तज्ज्ञ

  कॅलिफोर्निया विद्यापीठातील अभियांत्रिकीतज्ज्ञ रिचर्ड कोर्सी म्हणाले की , क्लास रूमच्या हवेत एअरोसोल असेल तर शील्ड नाकामी ठरेल . कार्यालये , शाळा आणि रेस्तराँतशील्ड लावताना अभियांत्रिकी तज्ज्ञांची मदत घेतली जात नासूण .ते प्रत्येक खोलीतील हवेचा प्रवाह आणि व्हेंटिलेशनबाबत सांगूशकतात . खोलीत हवेचा प्रवाह जटिल होतो.फर्निचर पॅटर्न , छताची उंची आणि शेल्फयांसारख्या वस्तूंचा त्यावर विशेषतः परिणामकारक ठरतात . त्यामुळे या पारदर्शक शील्डकडे संपूर्ण सुरक्षा देणारी वस्तू म्हणुन पाहिले जाऊ नये.जोखीम कमी करण्यासाठी मास्क वापरणे सुरू असने आवश्यक .

  Leave a Reply

  Your email address will not be published.