वैद्यकीय फिल्ड मधून मारली उडी गुन्हेगारीत, मुलाचे वडील पोलीस असून हे झाले तरी कसे, वाचा सविस्तर माहिती.

शेअर करा.

अहमदनगर : वैद्यकीय शिक्षण अपूर्ण सोडून स्वतःची एक टोळी तयार करत दरोडा , रस्तालूट , फसवणूक , घातक अशा हत्यारांचा वापर करून गुन्हेगार बनलेल्या सागर अप्पासाहेब भांड ( रा . ढवणवस्ती , नगर ) याच्यासह सत्याच्या संपूर्ण टोळीविरोधात पोलिसांनी मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे . सागर याचे वडील हे पोलीस दलात कार्यरत होते सागर भांड ( टोळी प्रमुख ) , रवी पोपट लोंढे , नीलेश संजय शिंदे , गणेश रोहिदास माळी , नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी , रमेश संजय शिंदे या साहिन विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे . या टोळीविरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये मयूर दिलीप देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दरोडा , आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे . त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केलेले आहे .

यादरम्यान , या टोळीने संघटीतपणे धाक दाखवून जबरी चोरी , दरोडा , मारहाण , हत्यारांचा धाक दाखविणे , असे गंभीर स्वरूपाचेगुन्हे केले आहेत . टोळी मधील प्रत्येक आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply