वैष्णव देवी मंदिरात झाली गर्दी , १२ जणांचा जागीच मृत्यू.

शेअर करा.

जम्मू : माता वैष्णोदेवी मंदिरात नववर्षाच्या प्रथम दिवशी घडून आलेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे , तर १६ जण जखमी असल्याचे कळाले आहे . मृत्यू झालेल्यांपैकी ७ जण हे उत्तरप्रदेशचे , ३ जण दिल्लीमधील तर प्रत्येकी १ जण हरयाणा व जम्मू येथील होते .

या घटनेची संपूर्ण तपासणी प्रधान सचिवांची समिती करणार आहे . कोरोनाचे निर्बंध असूनही हजारो भाविकांनी दर्शनाकरिता प्रचंड गर्दी केली होती . शारीरिक अंतर व मास्क यांच्या देखील कोणी पालन केले नव्हते . पहाटे २.४५ च्या सुमारास अत्यंत अरुंद गर्दी झालेली होती . दर्शनानंतरही अनेक भाविक त्याच ठिकाणी थांबले होते . यामुळे वादावादी झाली .

त्यातून धक्काबुक्की व नंतर चेंगराचेंगरी झाली व यामध्ये १२ मृत्यू झाल्याचे कळाले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply