बॉलिवूड ची चर्चित अशी जोडी शिल्पा आणि राज यांच्यावर येणारी संकटे थांबायचे नाव नाही घेत आहे पुन्हा त्यांच्यावर आरोप केला गेला आहे. दिल्लीतील व्यावसायिक विशाल गोयल यांनी शिल्या व राज यांच्यावर ४१.३३ लाख रूपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे . दिल्लीतील न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासह इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवरून दिल्ली पोलिसांकडे कारवाई अहवाल मागितला आहे . विशाल गोयल यांनी या लोकांवर लाखो रूपयांच्या फसवणुकीचा आरोप पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे . महानगर दंडाधिकारी मानसी मलिक यांनी गेल्या बधवारी पोलिसांकडे कारवाई
अहवाल मागितला आणि या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली , असे गोयल यांच्या वकिलाने म्हटले . आरोपींनी २०१८ मध्ये मुंबईच्या एका कंपनीत लाखों रुपये गुंतवण्यासाठी मला प्रेरित केले व गुंतवणूक करून घेतली . परंतु , त्यानंतर त्यावर काहीही परतावा मिळाला नाही आणि त्याच्या शेयरची किमतही खाली आले असे विशाल गोयल तक्रारीत सांगितले आहे.