वाल्हे : ‘ एक हजारी में मेरी बहना है सारी उमर हमें संग रहना है .. ‘ हे गाणे कित्येक वेळा आपण पाहिले आहे लहानपणी अनेक भाऊ – बहीण मोठ्या उत्साहात राखीपौर्णिमा साजरी करतात . बहिणीचे लग्न झाल्यावर प्रत्येक राखीपौर्णिमेला बहीण भायांची भेट होतेच असे नाही आणि बऱ्याच भावंडामध्ये राखी बांधण्याच्या कार्यक्रमात खंड पडतो . मात्र शंभर वर्षापासून आपल्या लाडक्या भावाला राखी बांधणारी आणि तितक्याच उत्साहाने तिच्याकडून राखी बांधून घेणारे यहीण भाऊ दौड व पुरंदर तालुक्यात आहेत . पुरंदर तालुक्यातील काळदरी खोयातील सटलवाडी येथील १०१ वर्षाये गजानन गणपत कदम यांना राखी बांधण्यासाठी त्यांची चोरनी बहीण अनुसया ज्ञानोबा गायकवाड
वय १०३ ) ही आजही तितक्याच उत्साहाने दौंड तालुक्यातील कासुद्धौं येवून आली आणि भावाच्या हातावर राखी बांधताना राखीपौर्णिमेचे शतक या भावंडांनी साजरे केले . अनुसया यांच्या पाठीवर जन्मलेल्या गजानन यांच्या जन्मानंतर तीन वर्षाच्या असलेल्या अनुसयांनी अगदी त्या पहिल्या वर्षापासून गजाननच्या चिमुकल्या हातावर राखी बांधायला सुरवात केली . पुढे अनुयसाबाईंचा विवाह झाला मात्र तालुक्या लगतच असलेल्या पुरंदर तालुक्यातील तालुक्यात तिचे सासर असल्याने दर राखीपौर्णिमेला अनुसया या माहेरी येतात त्यांना अगदीच शक्य झाले नाही त्यावेळी गजानन हेच बहिणीच्या सासरी जायचे मात्र त्यांची राखीपौर्णिमा मात्र अखंडपणे एकत्रित साजरी होत राहिली . या दोघांनीही बयाची शंभरी केल्यावरही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही आणि राखीपोर्णिच्या सणात खंड पडला नाही . त्यामुळे त्यांची आजची शतकी राखीपौर्णिमा हा दौड व पुरंदर तालुक्यात कुतूहलाचा विषय ठरला