• Tue. Aug 16th, 2022

  शहरात आज लसीकरण आहे बंद , जवळपास दोन दिवसांनी नवीन साठा मिळण्याची आहे शक्यता.

  ByKhandeshTimes

  Aug 25, 2021

  जळगाव : जिल्ह्यातील लसींचा साठा संपत आलेला असल्याने बुधवारी जिल्ह्यात कोठेही लसीकरण होणार नाही आहे. येत्या दोन दिवसही लसीकरण मोहिम ठप्प राहील . जिल्ह्याला शनिवारी १५ हजार लसींचे डोस मिळाले होते . ते शहर वगळता जिल्ह्यतील केंद्रांना त्याच दिवशी वापरण्याच्या अटीवर वितरित झाले . मंगळवारी जिल्ह्यातील केवळ ५ केंद्राकडे अवघ्या १० लसी शिल्लक आहे त्यात एरंडोल ३० , जळगाव ३० भादली व मुक्ताईनगर प्रत्येकी १० तर रावेर तालुक्यातील वाघोड येथे २० अश्या लसींचा साठा शिल्लक असल्याने बुधवारी जिल्ह्यात कोठेही लसीकरण होणार नसल्याचे सूत्रांनी कळविले . तसेच महापालिकेचे सर्व केंद्र लसी अभावी बंद असणार असल्याचे महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ . राम रावलानी यांनी कळवले आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.