• Tue. Aug 16th, 2022

  शहाद्याला मिळणार आता नवीन पोलीस ठाणे.

  ByKhandeshTimes

  Aug 19, 2021

  नंदुरबार : शहाद्याला नवीन पोलीस ठाणे तर उपनगर , मोलगीसह इतर ठिकाणच्या पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे . यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे . शहाद्याच्या पोलीस ठाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे . वाढती लोकसंख्याव आहे त्या पोलीस ठाण्यावरील ताण लक्षात घेता नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे . शहादा येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून , त्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे . यासाठी एक एकर जागा आधीच महसूल विभागाकडून मंजूर करून घेतली आहे . तर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यासह शहर पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीसाठीदेखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली .

  Leave a Reply

  Your email address will not be published.