शाळा १ डिसेंबर पासूनच होणार सुरू राजेश टोपे यांची मोठी घोषणा, लागू केली नवीन नियमावली.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमीक्रॉनच्या धास्ती मुळे संपूर्ण देशत अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे . करोनाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक राज्यांमध्ये पूर्ण क्षमतेने शाळा व इतर सोयी सुरु होणार होत्या . परंतु आता ओमीक्रॉनचा धोका पाहता शाळा सुरु होणार की नाही ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता . परंतु शाळा या ठरलेल्या दिवशीच १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितली आहे . महाराष्ट्राला अजूनपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका नाही , मात्र सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता दिसत आहे , हे देखिल राजेश टोपे यांनी सांगितले आहे .

महाराष्ट्राला अद्याप नव्या Omicron variant च्या प्रसाराचा धोका नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मीडियासमोर स्पष्ट केले . त्याच बरोबर शाळा सुरू होण्यासही काही हरकत नाही, शाळा ठरल्या वेळेनुसार सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . यामुळे राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू होण्याबाबतचा संभ्रम चालूपुरता तरी दूर झाला आहे .

शाळांकरिता नियमावली –

१. शाळेचा सर्व परिसर निर्जंतुक केलेला असावा .
२. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात .
३. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर , फेस मास्क याचा पुरवठा करावा
४.शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस तातडीने पूर्ण करावेत .
५. शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी गर्दी करणार नाहीत , याची शाळांनी काळजी घ्यावी .

पालकांसाठी व विद्यार्थी सूचना –

१. विद्यार्थ्यांनी शाळेत इतर विद्यार्थ्यांसोबत एकत्रीत येऊ नये .
२. विद्यार्थ्यांनी सामूहिक खेळ खेळू नयेत .
३. पालकांनी विद्यार्थ्यांना वाहनांमधून शाळेत पाठवताना वाहनांचे निर्जंतुकीकरण केले आहे की नाही , हे तपासून पाहावे .
४. शाळेत एकत्र येऊन डबा खाण्यास , जेवण्यास सक्त मनाई

Leave a Reply

Your email address will not be published.