शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच .

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच :
” ” या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक .
” स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा
शिक्षक !
” ” चिखलात ला जन्मही सार्थकी लावावा निसर्गासारखा शिक्षक प्रत्येकाला मिळावा ”
” आजचे शिक्षक भावी पिढीचे रक्षक ”
पूर्वी पासूनच मानवी जीवनात शिक्षणानाला खूप महत्त्व आहे .यात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर शिक्षण प्रक्रियेची यशस्वीता अवलंबून असते . शिक्षक हा शिक्षणातील नायक , दुवा , संवाददूत असतो . शिक्षक हा विद्यार्थिप्रधान असावा , विद्यार्थी हा शिक्षकप्रधान असावा आणि दोघेही ज्ञानाप्रधान असावेत वज्ञान हे सेवाप्रधान असावे , तरच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार आनंददायी होतो , मन , मस्तक आणि मनगट यांचा विकास म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची व्याख्या महात्मा गांधी यांनी सांगितली आहे.शिक्षणाची ही परिणामकारकता शिक्षकच साधू शकतो . निरंतरपणे आहुती , आई – वडील यांच्यानंतर शिक्षकच देऊ शकतात . विद्याथ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उणिवा शोधून त्यांच्या जाणिवा प्रगल्भ करण्याचे कार्य शिक्षक करतो . म्हणजे अंधार आणि म्हणजे प्रकाश हे साहित्यशास्त्र सांगते . अज्ञानाचा अंधार संपवून प्रकाशवाटा दाखविणारा गुरु असतो . म्हणूनच श्री दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले . जो जो जयाचा घेतलासे गुण तो तो म्या शुरु केला जाण गुरुशी आले अपारपण , जग संपूर्ण गुरु दिसे . चांगल्या गुणांचं भरणपोषण गुरु , शिक्षकचं करत असतात.शिक्षक शब्दाला विशेष महत्त्व आहे . शि म्हणजे शिलवान . सत्त्वशीलता हा पवित्र जसा संस्कार शिक्षकात असतो . झील एकीकडे आणि वाण उपाधीस पात्र होऊ शकत नाही.क्ष म्हणजे क्षमाशील क्षमावीरस्य भूषणम क्षमा हे वीरांचे भूषण आहे . हा पुरुषार्थ शिक्षकात असतो.क म्हणजे कर्तव्य हाच परमेश्वरही शिक्षकाची धारणा असते . निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म ही शिक्षकांची आंतरिकता असते खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अवि हा साने गुरुजींनी दिलेला आचारधर्म तो प्राणपणाने जतन करीत असतो . झ्यामची आई हा संस्कार तो आपल्या विद्यार्थ्यांकडून चिरंतन ठेवत असतो . शिक्षक आपल्या वाणीने विद्यार्थ्यांना , लेखणीने समाजाला आणि आचारविचाराने राष्ट्राला समृद्ध करीत असतो . शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे . माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही आपल्या मुलाखतीत राष्ट्रपतीपदाचा कालावधी संपल्यानंतर शिक्षक म्हणून सेवा करण्यास आवडेल असे सांगितले होते . असा हा शिक्षक पदाचा नव्हे , तर व्रताचा महिमा आहे . म्हणूनच संपूर्ण देश और शिक्षणतज्ज्ञ , माजी राष्ट्रपती डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस प्रेमभराने साजरा करतो . शिक्षक हाबहुश्रुत असतो . समाजातील अनेक गोष्टी ऐकून नेकसंदर्भावसार तो आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो . वाचनाचे वेह तो जपत असतो . वाचाल तर वाचाल ही मनोभूमिका तो जापल्या शिष्यांना पटवून देत असतो . आपल्या रसाळ भाषणाने शिक्षक समाजमनावर वेळोवेळी जनजागृती करण्यात सिंहाचा वाटा उचलत असतात . शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक संत सर्व शिक्षकांना आहे . गेल्या दीड वर्षापासून शिक्षक , विद्यार्थी यांचा आपसात विरह आहे . ऑनलाइन , ऑफलाइनच्या आभासी युगात मेन लाइन बंद आहे . ही बंद असणारी थेटलाइन , लेटलाइन का होईना ; परंतु लवकरात लवकर सुरू होवो , हाच खरा शिक्षक दिनाचा आनंदोत्सव आहे , तो मिळावा .

Leave a Reply

Your email address will not be published.