शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूजेत रात्रकालीन महाविद्यालय सुरू.

शेअर करा.

व्यवसायासह नोकरी करीत असताना शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच कमवा व शिका योजनेत कार्य करणाऱ्या विद्यार्थांसह विविध कारणांमुळे दिवसभरात शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थांसाठी केसीई सोसायटी संचलित मू . महाविद्यालयात कला वाणिज्य रात्रकालीन महाविद्यालय सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ नंदकुमार भारंबे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली . पहिल्या टण्यात पदवी वर्गातील प्रथम द्वितीय व तृतीय कला शाखेसह वाणिज्य शाखेचे वर्ग घेतले जाणार आहे . सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत हे वर्ग भरवले जाणार आहे . कला शाखेत संगीत , नाट्य , इंग्रजी , मराठी , राज्यशास्त्र , भूगोल , समाजशास्त्र हे विषय यासह वाणिज्य विषयाचे विषय घेवू शकणार आहेत . मू .जे . महाविद्यालयाच्या बँक ऑफ महाराष्ट्राजवळील इमारतीत हे वर्ग भरवले जाणार आहेत . जळगाव विद्यापीठाशी हे महाविद्यालय संलग्न असणार असून नियमित वर्गाप्रमाणेच अभ्यासक्रम व परीक्षा पदवी असणार आहे . यासह या विद्यार्थांना ग्रंथालय , क्रीडांगणासह स्पर्धात्मक परीक्षा क्षेत्राचाही लाभ घेता येणार आहे . या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थांनी त्वरित प्रवेश घ्यावेत असे प्राचार्यांनी सांगितले.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply