शिक्षणासाठी घरच्यांचे हाल पाहून १८ वर्षे मुलीने तणावात येऊन केली आत्महत्या, काय घडला प्रकार वाचा सविस्तर बातमी.

शेअर करा.

अमरावती : अमरावती जिल्ह्यामधील तिवस तालुक्याला एका १७ वर्षीय असलेल्या विद्यार्थिनीने शिक्षणाकरिता पैशाची कमी पडत असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सेजल जाधव हे या मुलीचं नाव आहे . या घटनेमुळे गावकऱ्यांना धक्कादायक असा झटका मिळाला आहे . आत्महत्या करण्यापूर्वी सेजलने चिठ्ठी लिहून ठेवली होती . त्यात आई , वडिलांवर ओझे होऊ नये याकरिता जीवन संपवत असल्याचे तिने पत्रामध्ये लिहिले आहे .

 

सेजलने हिने मृत्युपूर्वी १८ तारखेलाच सुसाइड नोट लिहून ठेवलेले होते . ‘ मी सेजल गोपाल जाधव आत्महत्या करणार आहे . माझ्या घरची परिस्थिती ही खूपच हलाखीची आहे . माझ्या घरामध्ये आम्ही सहा जण राहतो . फक्त माझी आई ही कामाला जात असते . आमच्यावर खूप कर्ज देखील आहे . आम्हाला राहण्यासाठी जागा देखील थोडीशीच आहे . माझा भाऊ लहान आहे . माझी आई हि कर्ज काढून आम्हाला शिकवते . माझ्या शेतामध्ये मागिल तीन वर्षे झाली उत्पन्न खूप कमी येतेय . माझे बाबा खूप काम करतात .मी इयत्ता बारावीमध्ये आहे परंतु अॅडमिशन फी भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत . मी खूप दिवसांपासून तणावाखाली आहे . या प्रकारे तिने पत्रात लिहिले आहे.

 

आपल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून मी स्वतःहून आत्महत्या करत असल्याचे तिने सांगितले आहे ‘ , असे यामध्ये तिने नमूद केले आहे . माझे आई बाबा हे माझ्यावर खूप प्रेम करतात . मी पण माझ्या आई वडिलांवर खूप प्रेम करते . मला कॉलेजमध्ये काही विषय हे समजत नव्हते . कॉलेजला जाण्याकरता युनिफॉर्मही देखील नाही .माझ्या बहिणीने माझ्याकरिता शाळा सोडली . ती कामाला जाते आहे . या सगळ्यामुळे मी तणावाखाली आहे त्याचबरोबर नापास होण्याचीही भीती देखील वाटत असल्याने मी माझे जीवन संपवत आहे , असेही सेजलने तिच्या सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply