शिक्षण विभागाचा निर्णय : जात प्रमाणपत्र देण्यास ३० दिवसांची मुदतवाढ.

शेअर करा.

पुणे : सद्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राअभावी अकरावी प्रवेशासाठी अडचणी निर्माण होतं आहे . त्यामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे . मुंबई महानगर , पुणे , पिंपरी चिंचवड , नाशिक , अमरावती आणि नागपूर महापालिकांच्या कार्यक्षेत्रात अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे . यासाठी विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे . दाखल्याअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशास अडचणी येत आहेत . त्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाने गेल्या ३० ऑगस्ट रोजी निर्देश जारी केलेआहेत.विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केला आहे . प्रस्तावाची पोच आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास ते प्रवेशासाठी पात्र असतील . ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र आणि प्रस्तावाची पोचही नाही , त्यांनी वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र आणि हमीपत्र दिल्यास ते मागास प्रवर्गातून प्रवेशासाठी पात्र राहतील . परंतु , या अटींवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना ३० दिवसांत स्वत : चे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील ; अन्यथा त्यांचे प्रवेश रद्द होतील.व्हीजेएनटी , ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासोबत उन्नत व प्रगत वर्गात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply