शिरवेल येथे महादेवाचे दर्शन घेउन येत असताना झाला अपघात : दोन जिवलग मित्रांचा एकाच वेळेस अंत.

जळगाव : .शहरातील कांचन नगरात राहणारे काही तरुण श्रावण सोमवारनिमित्त मध्यप्रदेशातील शिरवेल महादेव येथे दर्शनासाठी गेले होते . मालवाहू गाडीने दर्शन घेऊन घरी परतत असताना घाटात अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले . दोघेही कांचन नगर येथील रहवासी होते . त्यामुळे एकाच दिवसात कांचन नगर परिसरात दोन अंत्ययात्रा निघाल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती .

प्रशांत तांदुळकर व हर्षल परदेशी असे या जीवलग मित्रांची नावे असून पालनजीक सोमवारी रात्री अपघातात ते ठार झाले . प्रशांत तांदुळकर आणि हर्षल उर्फ गोलू परदेशी हे दोघंही जीवलग मित्र दोघांचेही लग्न झालेले नव्हते . प्रशांत याच्या आई , वडिलांचा पाच वर्षापूर्वी मृत्यू झाला . त्यांच्या मृत्यूच्या घटनेतून भावंडे सावरत नाही तितक्यात लहान भावाचा मृत्यू झाल्याने विनोद व संजय या दोन्ही भावांनी एकच हंबरडा फोडला . विनोद याचे लग्न झालेले आहे तर संजय व प्रशांत अविवाहित होते.प्रशांत हा रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावायचा.हर्षल हा एमआयडीसीतील चटई कंपनीत कामाला होता . त्याच्या पश्चात आई सुनीता , वडील शिवाजी मोठा भाऊ जितेंद्र असा परिवार आहे . प्रशांत याची अंत्ययात्रा दुपारी दीड वाजता तर हर्षलची अंत्ययात्रा सायंकाळी साडे सहा वाजता काढण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published.