शिष्यवृत्तीसाठी तत्काळ अर्ज करण्याचे महामंडळाचे आवाहन.

शेअर करा.

धुळे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत , असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले आहे .
सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात दहावी , बारावी , पदवी , पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांना
महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम तीन ते पाच विद्याथ्यांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे . पात्र विद्यार्थीनी तत्काळ अर्ज करावे , असे आवाहन महामंडळाने केले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply