शेतकरीसाठी आंनदाची बातमी , सर्व शेतकरीना मिळणार 6000 रूपये, PM Kisan सम्मान निधी योजनेअंतर्गत .

नवी दिल्ली : पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत , सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रुपये म्हणजेच 2000 रुपये असे तीन हप्ते पाठवते . परंतु , आतापर्यंत या योजनेच्या पात्रतेबाबत अनेक प्रश्न आहेत .
उदाहरणार्थ , पती आणि पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात का ? त्याचे नियम जाणून घेऊया .जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा ?

पती – पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ( पीएम किसान लाभ ) लाभ घेऊ शकत नाहीत . जर कोणी असे केले तर त्याला खोटे ठरवून सरकार त्याच्याकडून वसुली करेल . याशिवाय शेतकरी अपात्र ठरणाऱ्या अशा अनेक तरतुदी आहेत . शेतकरी कुटुंबातील कोणी कर भरल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही . म्हणजेच पती – पत्नीपैकी एकाने गेल्या वर्षी आयकर भरला असेल , तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही .

कोण अपात्र आहेत ?

जर एखादा शेतकरी आपली शेतजमीन शेतीच्या कामासाठी वापरत नसेल , परंतु इतर काम करत असेल किंवा इतरांच्या शेतात शेतीची कामे करत असेल आणि शेत त्याच्या मालकीचे नसेल . अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही . जर एखादा शेतकरी शेती करत असेल , परंतु शेत त्याच्या नावावर नसून वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही .जर कोणी शेतजमिनीचा मालक असेल , पण तो सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त , विद्यमान किंवा माजी खासदार , आमदार , मंत्री असेल तर असे लोकही शेतकरी योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत . व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर , अभियंता , वकील , चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे कुटुंबीयही अपात्रांच्या यादीत येतात . आयकर भरणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही .

Leave a Reply

Your email address will not be published.