शेतमजूराने गळफास घेण्याआधी केला मुलाला आत्महत्येचा फोन.

पाचोरा : कुटुंबातील लोक बाहेर गावी गेलेले असताना एका शेतमजुराने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील अंतुर्ली खुर्द प्र.पा. या ठिकाणी रविवारच्या पहाटे घडून आली. विशेष म्हणजे की आत्महत्या करण्याआधी त्यांनी आपल्या मुलाला फोन करुन आपण आत्महत्या करत आहे असे कळविले होते . ईश्वर भिकन गोसावी ( ५७ ) हे त्यांचे नाव असून . रविवारच्या सकाळी ४ वाजता त्यांनी छताला दोरी बांधून गळफास घेतला . १८ रोजी कुटुंबीय हे मुलांसह सासुरवाडीला तारखेडा या ठिकाणी गेलेली होती . गळफास घेण्यापूर्वी ईश्वर यांनी मुलगा गणेश यास फोनवर आत्महत्या करीत असल्याचे कळविले होते .

 

यावेळी मुलांनी सांगितले की ‘ असे का करता ? आत्महत्या करू नका ‘ म्हणून विनवण्या केल्या आणि तातडीने आईसोबत अंतुर्ली पोहोचले . परंतु त्यांना येण्यास उशीर झाला असून . याबाबतीत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदणी करण्यात आली आहे . या पश्चात पत्नी , दोन मुले , दोन मुली असा त्यांचा परिवार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.