• Tue. Aug 16th, 2022

  शेतीकाम आटोपून घरी आल्यावर घेतला गळफास

  धुळे : साक्री तालुक्यामधिल भडगाव याठिकाणी मुरलीधर श्रीराम बेडसे ( ५३ ) यांनी स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या जीवन यात्रेला पूर्णविराम दिला . सोमवारी सकाळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे .याबाबत साक्री पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे .

  २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील भडगाव शिवारामध्ये कांदा लागवडीचे काम सुरु होते . यातच मुरलीधर बेडसे हे घरी काम असल्याचे सांगून घराच्या दिशेने निघून आले . सायंकाळी उशिरा त्यांची पत्नी आणि मुलगा घरी आले असताना त्यांचे पती मुरलीधर बेडसे यांनी घरात झोक्याच्या दोरीला गळफास लावून घेतल्याचे समोर आले . हा प्रकार पाहून सर्व हादरले व यामुळे धावपळ सुरू झाली . लागलीच ग्रामस्थांच्या मदतीने मुलगा वसंत बेडसे याने मुरलीधर बेडसे यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले . डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले .

  याप्रकरणी वसंत बेडसे यांनी साक्री पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली . यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.